शरद पवार करणार ओल्या दुष्काळाची पाहणी, उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

7

राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नेहमीच शेतकऱ्यासाठी धावून येत असतात. ओल्या दुष्काळाने राज्यातील शेतकऱ्यांचे अक्षरक्ष: कंबरडे मोडले आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार १८ ते १९ ऑक्टोबर या दोन दिवसांत मराठवाड्यातील तुळजापूर, उमरगा, औसा, परंडा, उस्मानाबादमधील भागांना भेट देणार असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. तर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून बारामतीतील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठे नुकसान झालं आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती