बिहार विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे बिहारमध्ये निवडणुकीचे वेध लागले आहेत. शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ३० ते ५० जागा लढण्याबाबतचा शिवसेना विचार करत आहे. दोन दिवसात त्याबद्दल निर्णय होईल, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
थोड्या दिवसापूर्वी बिहारचे शिवसेना नेते मुंबईमध्ये संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यावेळी बिहार शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा हे देखील त्यावेळी उपस्थित होते. बिहार निवडणुकांमध्ये ५० जगांपेक्षा अधिक जागा पक्षाने लढवाव्या अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी सांगितले. तर, अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील असे संजय राऊत यांनी सांगितले होते. त्याचबरोबर माजी पोलीस अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देईल का? या प्रश्नावर त्यांनी दोन दिवस थांबा. सर्व चित्रं स्पष्ट होईल,’ असं उत्तर त्यांनी सांगितलं आहे.