राज्यात शिवसेना राष्ट्रवादी सत्तेत एकत्र आहेत. त्याचबरोबर बिहारमध्ये हे दोन्ही पक्ष युती करण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी तसे सूचक संकेत दिले आहेत. रविवारी शरद पवार आणि संजय राऊत यांच्या दीर्घकाळ चर्चा झाली. त्यावेळी बिहार निवडणुकीबाबत चर्चा झालीच शक्यता आहे.
यासंदर्भात अजून राष्ट्रवादी अथवा शिवसेनेकडून अधिकृत भाष्य केलं गेलं नाही. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीत सोबत प्रचार करण्याची संधी मिळाली तर आनंद होईल. राज्यात सोबत आहोत, बिहारमध्ये सोबत आल्यास चांगलेच होईल असं सुनील तटकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितलं. त्यामुळे सेना आणि राष्ट्रवादी बिहार मध्ये एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको.