80च्या दशकात श्रीदेवीने नागिनीची भूमिका साकारून सगळ्यांना घाबरवले होते. आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा नवीन इच्छाधारी नागीण मोठ्या पडद्यावर येणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर नागीणीची भूमिका पार पाडणार आहे. तिने नवीन प्रोजेक्ट साइन केला आहे.
श्रद्धाने एका ट्विटद्वारे ही बातमी दिली आहे, ‘तिने यामध्ये लिहले आहे की पडद्यावर नागिनीची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप छान अनुभव आहे. मी श्रीदेवी मॅमचा ‘नगिना’ चित्रपट पाहूनच मोठी झाले आहे आणि मला नेहमी भारतीय लोक परस्परांशी संबंधित असलेली भूमिका करायची होती. श्रध्दा कपूरच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘नागिन’ असे आहे. चित्रपटाचे दिगदर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. तर निखिल त्रिवेदी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट एक ट्रिलॉजी असेल. हिंदी चित्रपटामध्ये या थीम वर बरचसे चित्रपट झाले आहेत. अशात श्रध्दा कपूरला श्रीदेवीसारखं परफेक्शन जमणे खूप कठीण आहे.
श्रध्दा कपूरचा हा नवा प्रोजेक्ट असून याबद्दल ती खूप उत्साही आहे. यापूर्वी श्रध्दाने ‘स्त्री’ चित्रपटात भुताची भूमिका साकारली होती. यावेळी तिला नागिनीच्या भूमिकेत पाहणं हे चाहत्यांसाठी देखील उत्सुकतेचं आहे. श्रध्दाच्या या पात्राची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काही कालावधीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.