श्रीमंतीचा हव्यास; तुरीच्या मध्ये गांजाची लागवड

48

प्रत्येकाला श्रीमंत व्हावस वाटतं. त्यासाठी पैसे कमविण्याची अनेक युक्त्या लढवल्या जातात. अशीच एक युक्ती नाशिक मधील शेतकऱ्याने लढवली आहे. तुरीच्या शेतात त्यांनी गांजाची शेती करण्याचा अनोखा नियमबाह्य प्रयोग केला आहे. नाशिक मधील चांदवड येथील एका शेतकऱ्याच्या शेतात तुरीच्या पिकाच्या मध्ये गांजा पीक असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळताच छापा टाकला असता, तब्बल २३० ओली गांजाची झाडे मिळाली. ती पोलिसांनी तत्काळ जप्त करून, सदरील व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे.

यानिमित्ताने पुन्हा एकदा नाशिक मध्ये अनधिकृत गांजाच्या शेती बद्दल चर्चा होऊ लागली आहे. दुसरीकडे शेतकऱ्या व्यवस्थित हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी गांजा नाहीतर काय लावायचं हा संतप्त सवालही विचारला जात आहे. तूर्तास गांजा पिकाला बंदी असल्याने सदरील शेतकऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालाय. सुमारे ९ ते १० किलो गांजा पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे.