संजय राऊतांच्या त्या विधानावरुन कॉंग्रेसमध्ये नाराजी

42

केंद्रात भरभक्कम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे युपीएला बळकट करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी युपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे असे विधान शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केले आहे. मात्र संजय राऊतांच्या या विधानावरुन आता कॉंग्रेसमधून नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहे.

महाराष्ट्रात राज्य सरकारमुळे कॉंग्रेस नाही, तर कॉंग्रेसमुळे सरकार आहे. त्यामुळे संजय राऊतांनी बोलतांना भान बाळगायला हवे असे नत कॉंग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी मांडले आहे. शिवसेनेचा अजूनही युपीएमध्ये समावेश नाही. त्यामुळे संजय राऊतांना हे बोलण्याचा अधिकार नाही. स्वत: शरद पवारही असे बोलणार नाही. कॉंग्रेस हा प्रबळ पक्ष आहे. संजय राऊतांना असे हास्यास्पद विधानं करुन गोत्यात येण्याची सवयच आहे. त्यांना महत्व देण्याची गरज नाही. असे हुसेन दलवाई यावेळी म्हणाले.

कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीसुद्धा संहय राऊतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. संजय राऊत हे वारंवार अशा मागण्या करत असतात. परंतू शिवसेना युपीएचा भाग नाही. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. कॉंग्रेस केवळ भाजपच्याविरोधात असल्यामुळे शिवसेनेसोबत आहे. असेसुद्धा सचिन सावंत यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांना यावर विचारणा केली असता, कॉंग्रेसमधून त्यांच्या वक्तव्यावर कुठलिही प्रतिक्रिया येत नसल्याचे म्हटले होते. मात्र कॉंग्रेसमधील नेते संजय राऊत यांच्या त्या विधानावर नाराजी व्यक्त करत टीका करत आहे.