संजय राठोड यांनी माध्यमांतील प्रतिनिधींना केली विनंती!

14

पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले होते. विरोधी पक्षातील भाजपने यावरुन सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारवर चांगलीच टीका केली. अखेर संजय राठोड यांनी याप्रकरणी मौन सोडले आहे. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी याठिकाणी त्यांनी आज कुटुंबासमवेत दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते.

गेल्या पंधरा दिवसांपासून संजय राठोड यांचे नाव माध्यमांत चर्चिल्या जात आहे. त्यामुळे संजय राठोड यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना विनवनी केली आहे. “मागील काही दिवसांपासून माझी सामाजिक प्रतारणा करण्याचा प्रकार सुरु आहे. माझे राजकीय आणि सामाजिक कारकीर्द संपवण्याचा हा प्रकार आहे. मला व माझ्या कुटुंबाला यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. परिणामी यामधून सावरण्यासाठी मला वेळ घ्यावा लागला. त्यामुळे माझी आपणांस विनंती आहे की कृपया माझी बदनामी करु नका” अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी व्यक्त केली आहे.

सोशल मिडियात माझ्याबाबत जे काही दाखवण्यात आले आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. तपासादरम्यान सगळ्याच गोष्टी पुढे येतील असेसुद्धा संजय राठोड यावेळी म्हणाले.

संजय राठोड यांच्या प्रतिक्रियानंतर मात्र पुन्हा भाजपने शिवसेना आणि मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंवर टीका करमन्यास सुरुवात केली आहे. संजय राठोड यांचे बंजार समाजात प्रभृत्व आहे. त्यामुळे राठोड पोहरादेवी येथे येणार हे कळताच त्यांच्या समर्थकांनी याठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. यादरम्याम कोरोनाच्या मियमांचे ऊल्लंघन झाले. याच मुद्द्याला हेरुन भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागण्याचा प्रयत्न चालवला आहे.