संपूर्ण महाराष्ट्र होणार अनलॉक !

21

‘आता लॉकडाऊनचा विषय राहिला नसून महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होणार’ असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अहमदनगर येथे पत्रकारांशी सवांद साधताना व्यक्त केले आहे. तसंच, RTPCR टेस्टचा रेट 800 रुपयांपर्यंत कमी केल्याची माहिती सुद्धा राजेश टोपे यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी अनलॉक बद्दल विस्तृत माहिती दिली. आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे, असं देखील यावेळी राजेश टोपे म्हणाले. नियम पाळणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यांना कोरोनाकाळातील सर्व नियम काटेकोरपणे पाळणे महत्वाचं आहे. असं ते म्हणाले.

भारतात कोरोनाचा प्रसार जोरात होत आहे. दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना विषाणूनं देशभरात सुमारे 69 लाख जणांना ग्रासलं आहे. तर सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनामुळे जीव गेला आहे.