2020 च्या शांतता नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न सुरक्षा कार्यक्रमाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न मोहिमेला (वर्ल्ड फूड प्रोग्राम) मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीडीश अकॅडमीने हा पुरस्कार जाहीर केला.
संघटना जगभरातील भूकबळी संपवण्यासाठी लढते. भूकभळी रोखण्यात मोठी भूमिका निभावली आहे. याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राची ही एक महत्वाची संस्था आहे. जगात एखाद्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती असेल तर गरजू लोकांपर्यंत अन्न पुरवठा करण्याचे काम या संस्थेअंतर्गत केले जाते. WRP संघटनेमार्फत दरवर्षी सुमारे 88 देशांतील 97 मिलियन लोकांची मदत केली जाते. WFP ला 1.1 मिलियन अमेरिकन डॉलर बक्षीस रक्कम म्हणून मिळणार आहे. जागतिक अन्न मोहीम निश्चित लोकसंख्येपर्यंत अन्न आधारित सामाजिक सुरक्षा कवच सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
नॉर्वेजियन नोबेल इन्स्टिट्यूटचं मुख्यालय असलेल्या ओस्लो येथून 101 नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 211 व्यक्ती आणि 107 संघटना यांना नामांकान मिळालं होतं.