महाराष्ट्रात ओल्या दुष्काळामुळे नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. वयाच्या 79व्या वर्षी सुद्धा पवार स्वतः नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले. तर भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी पवारांवर टिका केली आहे.
शरद पवारांना या वयात बांधावर जावं लागतंय हे महाआघाडीचं अपयश असल्याची टिका पडळकरांनी केली. जसे कारभारी त्यांनी सरकारमध्ये बसवले आहेत, हे कारभारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पवार साहेबांना स्वतः जाउन पाहणी करावी लागतेय. आता सत्ताधारी पक्ष असतानाही त्यांना दौरे करावे लागत असल्याची टिका पडळकरांनी केली.
दरम्यान शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी पवार नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार प्रतिनिधित्व म्हणून ती दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीस धावून येतील अशी अपेक्षा जनतेकडून केली जात आहे.