बुलढाणा : देऊळगावराजा तालुक्यातील मोहाळ येथे समर्थ कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या कु. निकिता राजू पांढरे यांनी ग्रामीण लोकांना व शेतकऱ्यांना लसीकरण याबद्दल मार्गदर्शन केले. पावसाळा सुरू झाल्यानंतर जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवत असतात ,या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे असते. या लसीकरणा मध्ये FMD,BQ,HS इत्यादी प्रकारांच्या लसीकरण याचा समावेश होतो.शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण का करावे? त्याचे होणारे फायदे याबद्दल समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी महत्त्व पटवून दिले. यावेळी समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे सर समन्वयक मोहजित सिंग राजपूत सर व प्रा श्वेता धांडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
प्रतिबंधात्मक उपाय
जनावरांना आजार उद्भवू नये म्हणून रोग प्रतिकार बंधक लस टोचणे फायदेशीर ठरते. संकरित व देशी जनावरांना वर्षातून दोन वेळा ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि मार्च-एप्रिल महिन्यात वैद्यकीय अधिकार्याकडून लस टोचून घ्यावी.
लसीकरणापूर्वी घ्यावयाची काळजी
जनावरांना लसीकरण पूर्वी किमान एक महिना आधी जंतुनाशक औषध द्यावे, तसेच जनावरांच्या अंगावरील गोचीड, गोमाशा, लिखा या कीटकांचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना सकस आहार व क्षार आणि जीवनसत्व द्यावे.