- गंगाजल पाटील
मुंबई,दि.०४ ऑक्टोंबर
महिलांवरील वाढते आत्याचार घटना रोखण्यासाठी अशी चर्चासत्रे उपयोगी ठरतील म्हणून स्त्री स्वसंरक्षण चर्चासत्रे महाराष्ट्रात सर्वत्र होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आयोजक गंगाजल पाटील यांनी केले.
“महिला सुरक्षा” (सायबर सुरक्षा, महिलांची सामाजिक सुरक्षा, स्वसंरक्षण, महिलांविषयीचे वृत्तांकन) या विषयावरील ऑनलाइन चर्चासत्र Google meet यावार कनिष्ठ अभियंता संघटनाचे महिला सचिव श्रीमती गंगाजल पाटील यांनी आयोजित केले होते.
या चर्चासत्रात श्रीमती प्रियंका शिगवण(किक बॉक्सिंग प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू), श्रीमती सुवर्णा जोशी – खंडेलवाल
धर्मादाय उपायुक्त, महाराष्ट्र राज्य व
राजपत्रीत अधिकारी महासंघ महिला सरचिटणीस उपस्थित होते, आदींनी विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना महीलांनी आपल्या सौदर्याबरोबरच शरिराला कणखर बनवण्यास प्राधान्य दयायला हव. ही आता काळाची गरज आहे व समाजात होणा-या हींसक घटनेच्या अमानुष मानसितेला आळा घालण्यासाठी नुसती गरजच नव्हे तर आवश्यक अंगच बनल आहे. घटना झाल्यावर आक्रोश होतो त्यापेक्षा आधीच बोलत्या व्हा व वेळीच प्रतिकार करा. तेव्हाच अमानुष घटनांना आळा बसेल. रणरागिणीने दरवेळी कृष्णाची वाट का बघावी ? दरवेळी मदतीला कुणी येईल याची वाट न बघता स्व:संरक्षणार्थ सज्ज होण गरजेचं आहे. तरच आपण सावित्रीबाई च्या लेकी सार्थ ठरू या आपल्या वक्तव्यातून उपस्थितांची मने जिंकली. तसेच चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या श्रीमती अनुपमा खरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांनी महिला स्वसंरक्षण जागृतता याबाबत महिलांनी शिक्षणासोबतच स्वतः बाबत जागरूक सजग रहायला शिकले पाहिजे. अन्याय सहन न करता अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. आपल्या मानसिकतेत काळानुरूप बदल घडून येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाऊन धैर्याने लढले पाहिजे. कायद्याचे संरक्षण महिलांना आहेत तसेच स्त्री-पुरुष समानतेची जाणीव आपण आपल्या घरापासूनच आपला मुलगा-मुलगी पासून दिली पाहिजे.
आजच्या घडीला स्त्रीयांसाठी विशेष कायदे आहेत व स्त्रियांनी स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडून अन्याय सहन न करता कायद्याचे संरक्षण घेतले पाहिजे व त्यासाठी न डगमगता पुढे आले पाहिजे तक्रार केली पाहिजे हे वक्तव्य केले. सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता मुलींना नाही तर मुलांना खरी गरज आहे शिकविण्याची की कसे वागायचे असे प्रतिपादन करत मातृशक्ती सर्वश्रेष्ठ असून आजच्या सामाजिक परिस्थितीत मातृशक्ती समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पार पाडू शकते, असा विश्वास मला वाटतो असे प्रतिपादन श्रीमती चारुलता चौधरी (वैज्ञानिक अधिकारी, नाशिक व
महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचे People United against Sexual Harassment सदस्य) यांनी केले. किक बॉक्सिंग प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू श्रीमती प्रियंका शिगवण, श्रीमती श्रद्धा पवार व श्रीमती सायली शिवतरकर यांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षणाचे धडे दिले तर
श्रीमती वैशाली परुळेकर (महिला व बाल विकास विभाग, परिवीक्षा अधिकारी) यांनी महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत कार्यरत योजना बाबत बोलताना कामाचे ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लेंगिक छळापासून सरंक्षण (प्रतिबंध , मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत गठीत कमिटी बाबत माहिती सांगितली. तसेच सदर कमिटी ने महिलांमध्ये जागरूकता निर्माण होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर महिलांसाठी कोविड-१९ या विषाणूमुळे होणाऱ्या आजारामुळे सर्वजण भीतीच्या छायेखाली वावरत असताना त्यात कौटुंबिक हिंसा हि अशी एक समस्या आहे जीचा महिलांच्या शारीरिक मानसिक आरोग्यवर परिणाम होतो. लॉक डाउन च्या परिस्थितीत हिंसाग्रस्त महिलेस तिचे मनमोकळे करण्यासाठी व स्वतःवर होणाऱ्या हिंसेसाठी बोलण्यासाठी व मनाचा लॉक डाउन खोलण्यासाठी ‘मला बोलायचे आहे’ हा ऑनलाइन तात्पुरता मंच सुरु केला होता. सदर मंचात हिंसाग्रस्त महिलेस समुपदेशन करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती सांगितली. लॉकडाउनच्या काळात विभागाच्या अंतर्गत कार्यरत समुपदेशन केंद्राचे समुपदेशक यांनी क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांना समुपदेशन केल्याची माहिती दिली. त्याचबरोबर महिलांकरिता हेल्प लाईन नंबर बाबत माहिती दिली. प्रा.डॉ.श्रीमती रचना सचिन माने,(स्त्रीवादी अभ्यासिका, सामिक्षिका, कोल्हापूर) यांनी रणरागीण्यांनो पदर खोचून सज्ज व्हा. गुंडांना धडा शिकवा. स्वसंरक्षण करा. कराटे, ज्युडो चे धडे गिरवा आणि संरक्षण म्हणून नेल कटर जवळ बाळगा.
मेणबत्या विझवा आणि गुंडांच्या कानाखाली पेटवा असे स्वसंरक्षण चर्चासत्र ची आवश्यकता पटवून देताना सांगितले. या चर्चासत्राची सुरवात अत्यंत अनोख्या पद्धतीने करण्यात आली. सर्वप्रथम सर्व पीडित महिला-मुलींना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि नंतर आतापर्यंतच्या सर्व कर्तृत्ववान महिलांचे स्मरण करून त्यांना उपस्थित सर्वांनी सॅल्यूट करून मानवंदना दिली, सर्वांची ही सामूहिक कृती म्हणजेच या चर्चासत्र ची सुरवात म्हणून जाहीर करण्यात आले. महिला शासकीय अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.