कोरोनामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर मोठ्या प्रमाणत ताण पडला आहे. वैद्यकीय सेवांवर खर्च वाढल्याने. तो खर्च राज्याला सोसवत नाही. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी सरळसेवा नोकरी भरती न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे लिपिक, टंकलेखक, वाहनचालक, शिपाई, ही पदे ठेकेदारांकडून भरले जाणार आहेत. असे निर्देश वित्त विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.
राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट निर्माण झालंय. आर्थिक तूट निर्माण झाल्याचं कारण पुढे करत हा निर्णय घेतला गेल्याचं कळतंय. कोरोना मुळे आधीच व्यापार, उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यातच आता नोकरभरती रद्द झाल्याने सुशिक्षित तरुणांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
राज्यातील 40 टक्के मंजूर पदे अजूनही रिक्त आहेत. त्यांच्या भरतीसाठी शासन स्तरावर कुठलेही प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे सुशिक्षित तरुणांवर कायम अन्याय होत असल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण झाली आहे. त्यात हे कंत्राटीकरण तरुणांच्या डोक्यावर लादलं जात आहे.