सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांचे पुन्हा नियोजन सुरू झाले यामध्ये आता तांत्रिक अडचणी दूर होण्याच्या मार्गावर आहेत. सर्व अडचणी दूर करून अंतिम वर्षाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा शनिवारी सुरू असल्याचे दिसत आहे.
सकाळी विद्यार्थ्यांना पेपर व्यवस्थित दिसत नसल्याच्या तक्रारी होत्या. तसेच लॉगइन करण्यात देखील अडथळे येत होते. नेटवर्कच्या बिघाडामुळे सबमीट झालेले पेपरही विद्यार्थी देऊ शकले नव्हते.
एम ए मराठीच्या प्रसारमाध्यमे व मराठी साहित्य या विषयाच्या परिक्षेमध्ये 40 ते 42 प्रश्नातील दोन पर्याय दिसत नव्हते. या सर्व तक्रारी विद्यार्थ्यांकडून आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबरोबर संपर्क साधून ही माहिती कळवली.