सलमान, शाहरुख, आणि अमीर यांची दिल्ली हायकोर्टात धाव

17

सुशांतसिंह राजपुतच्या मुत्युप्रकरणी चौकशी सुरू असताना बॉलीवूडमधील अनेक ड्रग्ज कनेक्शन समोर आले. अनेक सेलिब्रिटी चेहरे देखील या प्रकरणात दिसून आले. रिया चक्रबोर्ती, श्रद्धा कपुर, सारा अली खान, दिपीका पदुकोण, रकुल प्रीत यांचा समावेश देखील होता.

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीची बेजबाबदारपणाने बदनामी करणाऱ्या मिडिया हाउस विरोधात शाहरुख खान, सलमान खान आणि अमीर खान यांच्या निर्मिती संस्थासह 38 संस्थांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ज्यामध्ये बॉलीवूडवर अपमानास्पद, बेजबाबदार तसेच बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या मिडिया हाउसंना आणि जर्नालिस्टला ते रोखण्याची विनंती करण्यात आली आहे.

बॉलीवूडच्या निर्मिती संस्थांनी रिपब्लिक टिव्ही, टाइम्स नाऊ, राहूल शिवशंकर, नविका कुमार, अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान चार महिन्यात भरपूर रिपोर्टस बोलीवूडबाबत चुकीचे बोललेले दिसत आहेत. विशेष म्हणजे ड्रग्जच्या तपसामध्ये अनेक बॉलीवूडमधील सेलेब्रिटीचा संबंध जोडला आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीदरम्यान बॉलीवूडची प्रतिमा मलिन करण्याचा किंवा बातम्या भडक करून दाखवण्याचा प्रयत्न काही चॅनेल्सकडून घेत असल्याचा आरोप काही बॉलीवुडने सोशल मिडीयाच्या माध्यमातुन केला आहे.