सध्या बॉलीवूडमध्ये लग्नसराईचा क्रेझ सुरू आहे. अनेक कलाकारांनी कोरोना काळात लग्न केले आहे. अजून काही कलाकार लग्न सोहळा उरकतील अशीही चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या अफेरची चर्चा होत असते. दोघांना अनेकवेळा एकत्र बघण्यात येत. पण दोघांनी कधीही याबाबत खुलासा केला नाही. मात्र, कपिल शर्मा शोमध्ये अक्षय कुमाराने कियाराची पोलखोल केली आहे. अक्षय आणि कियारा यांचा नवीन सिनेमा ‘लक्ष्मी’च्या प्रमोशनसाठी कार्यक्रमात आले होते. त्यावेळी अक्षयने कियाराची गंमत करताना हे वक्तव्य केलं याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या शोमध्ये कपिल शर्मा कियाराला तिच्या ‘लव्हलाईफ’ बद्दल प्रश्न विचारतो. यावर कियारा उत्तर देते की, मी आता माझ्या पर्सनल लाईफबाबत काही बोलणार नाही. तेव्हाच बोलेन जेव्हा माझं लग्न होईल. कियाराचे हे उत्तर ऐकून सगळे गप्प झाले. यावर कपिल म्हणाला, त्या व्यक्तीसाठी टाळ्या वाजवू ज्याच्यासोबत कियारा लग्न करणार आहे. सध्या तर आम्ही शुभेच्छा देऊ शकतो. यावर अक्षय कुमार म्हणाला की, “ये बडी सिद्धांतोवाली लडकी है”. अक्षयच्या या उत्तरावर सगळेच हसु लागले. आणि कियारा लाजु लागली त्यामुळे कियाराच्या लाजण्याने चाहत्यांना प्रश्नात टाकले आहे. दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थ ‘शेरशाह’ चित्रपटात प्रथमच एकत्र दिसणार आहेत.
सोशल मिडियावर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. काही दिवसांपासून चित्रपटाच्या नावावरून आणि पात्रावरून हा वादातही अडकला होता. या चित्रपटाचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ नसून आता ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले आहे. 9 नोव्हेंम्बरला हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मसवर रिलीज होणार आहे.