चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी खराब परफॉर्मन्स मुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील मॅच मध्ये धावा घेतांना खूप थकलेला दिसत होता. धोनीच्या संथ खेळावरून तो थकला असल्याच्या चर्चा सुद्धा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. धोनीच्या वयावरून सुद्धा त्याला ट्रोल केलं जातंय. तर दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीचे समर्थक चाहते धोनीची पाठराखण करत असल्याचं दिसतंय.
त्यातच आता माजी जलद गोलंदाज इरफान पठाणने सुद्धा त्यावर ट्विट केलंय. पठाण म्हणतो, ‘फक्त दोन ओळींनी डोकं गरगरलं, संपूर्ण पुस्तक वाचलं तर चक्कर सुद्धा येईल.’ पठाणच्या या खोचक ट्विटचा अर्थ महेंद्रसिंह धोनीशी जोडण्यात येतोय. यापूर्वीही इरफान पठाणने ट्विट केलं होतं. त्यावेळी तो, ‘काही लोकांसाठी वय हे केवळ एक नंबर असतं. तर काहींसाठी संघातून हकालपट्टी करण्याचं एक कारण’ असं म्हणाला होता. त्याने वेळोवेळी धोनीवर अप्रत्यक्ष टीका केली असल्याचं म्हटलं जात होतं.