शुल्लक कारणावरून गोंदियामध्ये सुनेने सासूची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी सुनेला पोलिसांनी अटक केलंय. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तीगावात ही घटना घडली असून, सुनेने आपल्या ६८ वर्षीय सासूची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी सुनेचे डीलेश्र्वर बारेवार असं नाव आहे. आमगाव तालुक्याच्या तीगावात राहणाऱ्या 23 वर्षीय डिलेश्वरीने आपल्या 68 वर्षीय सासू तिरणबाई याची 23 आक्टोबरच्या रात्री गळा आवळून हत्या केली. मात्र, ही बाब तेव्हा उघडकीस आली नाही.
तिरणाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीवर घेऊन जात असताना घराच्या लोकांनी त्यांची आंघोळ घातली. तेव्हा तिरणाबाईच्या गळ्यावर काही खुणा त्यांच्या मुलीला दिसल्या. आईचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या झाल्याचं मुलीच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ याची माहिती आमगाव पोलिसांना दिली. 25 ऑक्टोबरला सासूच्या मृतदेहाचे छावविच्छेदन करण्यात आले. तसेच पोलिसांनी चौकशीदरम्यान सुनेला याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने सासूची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी सुनेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली.