आपल्या दिलखेचक अदांनी घायाळ करणाऱ्या सपना चौधरीला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. सपना चौधरी ही हरयाणवी गाण्यांवर डान्स करणारी डान्स असून तिच्या घायाळ करणार्या डान्स स्टेपचे सगळेच दिवाने आहेत. सपनाने आपल्या लग्नाची बातमीदेखील गुप्त ठेवली तिने जानेवारी महिन्यातच वीर साहू याच्याशी लग्न केलं होतं.
सपनाचा नवरा वीर साहू यानेच सोशल मिडीयाचा आधार घेत ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. वीर साहूच्या कुटूंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांनी आपल्या लग्नाची खबर कुणालाही लागू दिली नव्हती. वीर साहू हा हरियाणाचा रहिवासी असून त्याच्या चाहत्यांची संख्यादेखील मोठी आहे. तसेच त्याने चित्रपटात अभिनय देखील केला आहे.