सुशांत सिंग प्रकरण : भाजप, कंगना, आठवले, छाती बडवनारे कुठे गेले – अनिल परब

23

AIIMS म्हणजेच इंडिया इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या बहुप्रतीक्षित सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील अहवाल सादर केला आहे. डॉक्टरांच्या एका पॅनलने हा अहवाल सादर केला. या अहवालानुसार, सुशांत सिंह राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच असल्याचं म्हटलं आहे.  हा अहवाल सादर होताच शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपसह रामदास आठवेल आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे.

सुशांत प्रकरणात छाती बडवणारे गेले कुठे? असं त्यांनी म्हटलंय. AIIMSचा रिपोर्ट छाती बडवणाऱ्यांसाठी चपराख आहे. राजकारणासाठी, मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी, हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं होतं. जे लोकं या अभिनेत्याच्या बाबतीत छाती पिटून रडत होते ते हाथरसच्या प्रकरणात गप्प का? सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले कंगनाच्या संरक्षणासाठी धावले होते, पण एका गरीब मुलीला न्याय देण्यासाठी त्यांनी एक चकारशब्द देखील तोंडातून काढला नाही. फक्त शिवसेनेची बदनामी हाच एक यांचा उद्देश आहे, हे देशाचं दुर्दैवं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.