सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींची सुटका

15

विरारमधील ग्लोबल सिटी या हाय प्रोफाईल परिसरात राहत्या घरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलं आहे. अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने काल रात्री ही कारवाई केली. या कारवाई मध्ये तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. त्यासोबत एक महिला आणि एक पुरुषाला अटक करण्यात आलंय. उच्चभ्रू लोकांच्या वस्तीत वेश्या व्यवसाय होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

एका भाड्याच्या घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती नालासोपारा येथील अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. पोलिसांनी सुरुवातीला एक बोगस गिऱ्हाईक पाठवून मिळालेल्या माहितीची आणि तिथल्या परिस्थितीची खातरजमा केली असता भाड्याच्या घरात वेश्या व्यवसाय करण्यासाठी 3 मुली आणल्या असल्याचे निदर्शनास आले. पक्क्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ धाड टाकून कारवाई केली आहे.