महाराष्ट्र आणि गोवा राज्यात दिनांक 28 जून 2020 रोजी सेट परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व झालेल्या बिकट परिस्थितीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे अनेक दिवसांपासून परीक्षेची विद्यार्थी, उमेदवार वाट पाहत आहेत. आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी मिळाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत घेण्यात येणारी सेट परीक्षाही 27 डिसेंबर 2020 रोजी आहे. असे प्रसिद्धी पत्रकात जाहीर झाले आहे. ही परीक्षा 28 जुलैला होणार होती. पण कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेची सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. http://setexam.unipune.ac.in