सोनिया सेनेपेक्षा बाबरसेना बरी, कंगणाने पुन्हा एकदा डागली शिवसेनेवर तोफ

17

नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कंगणा राणावत ने पुन्हा एकदा उद्धव सरकारवर हल्ला केला आहे. महाराष्ट्र सरकार बार आणि रेस्टॉरंट चालू करू शकते मात्र मंदिरे चालू करू शकत नाही. एकेकाळी धर्मनिरपेक्षता शब्दाचा तिरस्कार करणाऱ्या सेनेला आता धर्मनिरपेक्षता प्रिय झाली असल्याचे कंगणा म्हणाली तसेच शिवसेनेची तुलना बाबर सेनेशी करताना ही तर बाबर सेनेपेक्षाही भयनक असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या ट्विटला रिट्विट करताना कंगनाने ही टिका केली. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील धार्मिक स्थळे सूरू करण्यात टाळाटाळ होत असल्याबद्दल विचारणा केली होती.याआधी सुशांतसिंग प्रकरणावरून कंगनाने अनेकदा मुंबई पोलिंसाना फैलावर घेतलं आहे. तसेच खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्या शाब्दिक बाचाबाची देखील झाली आहे.