एखाद्या नटाने असा डायलॉग एखाद्या चित्रपटासाठी म्हणणं आणि फिल्म्स सारख्या अस्थिर क्षेत्रात स्वतःपासून लाईनची सुरुवात करणं यात खूप मोठा फरक आहे. मात्र, तो फरक चंदेरी दुनियेतील एक व्यक्तीसाठी लागू नव्हता. त्यांचं नाव अर्थात ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन होय, तेच अमिताभ ज्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात एक, दोन, तीन नाहीतर तब्बल बारा फ्लॉप फिल्म दिल्या. आणि त्यानंतर त्यांनी मिळवलेले यश सर्वश्रुत आहे. आज त्यांचा वाढदिवस. त्यांचा तोच फ्लॉपर ते टॉपर वाला ‘शहेनशहा’ प्रवास समजून घेऊयात…
अमिताभ बच्चन हे आज 78 वर्षांचे झाले आहेत. कधीकाळी इंजिनियर बनण्याचं स्वप्न पाहणारा हा तरुण, आपल्या दमदार आवाज, अभिनय आणि प्रामाणिकपणाने पूर्ण फिल्म जगतामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करतो, हे खरच विशेष आहे. 11 ऑक्टोबर 1942 या दिवशी युपीच्या इलाहाबाद मध्ये अमिताभ यांचा जन्म झाला. अमिताभ यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन कवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची आई तेची बच्चन ह्या आत्ताच्या पाकिस्तानातील कराचीच्या होत्या. ही त्यांची छोटीशी कौटुंबिक माहिती…
70/80 च्या दशकात बॉलिवूडवर अमिताभ बच्चन यांनी राज्य केलं. बरोबरच रसिकांच्या मनावर ते आजतागायत अधिराज्य गाजवत आहेत. जंजीर चित्रपटामुळे अमिताभ ओळखले जाऊ लागले. फिल्म जंजीर अशी काही सुपरहिट ठरली की, त्यानंतर अमिताभजी यांना मागे वळून पहावच लागलं नाही. जंजीर चित्रपटामुळे फिल्मी करिअरची गाडी व्यवस्थित धावू लागली. जंजीर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम रचले. त्यानंतर मात्र त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट फिल्म्स देण्याचा सपाटा लावला. आत्तापर्यंत अमिताभ यांनी अनेक सुपरहिट फिल्म दिल्या. त्यामध्ये सात हिंदुस्तानी, आनंद, जंजीर, अभिमान, सौदागर, चुपके-चुपके, दीवार, शोले, कभी-कभी, अमर-अकबर एंथनी, मुकद्दर का सिकंदर, डॉन, त्रिशूल, मि. नटवरलाल, लावारिस, सिलसिला, कालिया, सत्ते पर सत्ता, नमक हलाल, शक्ति, कुली, शराबी, मर्द, शहंशाह, अग्निपथ, मोहब्बतें, निशब्द, बंटी और बबली, चीनी कम, पा, ब्लैक, पीकू, सत्याग्रह ह्या चित्रपटांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील.
अमिताभ यांनी खरी ओळख हा त्यांचा भारदस्त कापता जाणाऱ्या आवाजामुळे आहे. त्याच आवाजाच्या लेहज्यामुळे आणि शब्दफेक इत्यादींच्या माध्यमातून त्यांनी अनेक संवाद अजरामर केलेत. आजही अनेकांच्या तोंडावर ही डायलॉग लीलया रुळतांना पाहायला मिळतात. सर्वश्रेष्ठ अभिनेत म्हणून त्यांना पाचवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं आहे. तर, चौदा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तसेच अनेक नामांकित फिल्म फेस्टिव्हलमध्ये अगणित पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. त्याचबरोबर दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे सरकारी अनेक पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाले आहेत.
आज घडीला अमिताभजी यांच्या सोबत तुलनेला उभा करावा असा कुठलाही नट दृष्टिक्षेपात नाही. कारण, वयाच्या 78 व्या वर्षीही तितकंच पॅशनेट काम अमिताभ करत आहेत. त्यांची कामातील ऊर्जा ही अनेक अभिनेत्यांना लाजवेल अशी आहे. अमिताभ ग्रेट असाण्याच कारण नेमकं हेच आहे. त्यांनी स्वतःला वय आणि काळानूरूप बदललं आहे. बदलाची प्रत्येक परिभाषा त्यांनी अवगत केली आहे. म्हणूनच ते आज घडीला चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेत्यांनमध्ये उठून दिसतात. त्यांची रेषा पुसून अथवा त्यांच्याबाजुला दुसरी रेषा जरी मारली तरी त्यांच्या रेषेपेक्षा मोठी रेषा मारणं अवघड आहे. बाकीच्या अभिनेत्यांच्या आधुनिकतेच्या रेषा त्यांच्या अनुभवी रेषेसमोर तग धरू शकत नाहीत. त्यांनी सर्व समकालीन अभिनेत्यांना मागे टाकत कायम टॉप स्थान मिळवलं आहे.
त्यांच्या आवाजामुळे त्यांना रेडिओ मधून हाकलून दिल्याबद्दल अनेक माध्यमांनी लिहिलं आहे. पण त्याच आवाजाचं वेगळेपण वेळोवेळी सिद्ध झालंय. हेही नाकारता येणार नाही. कोरोनाकी बिमारी मास्क पहेनना हैं जरुरी अस प्रत्येक फोनवर म्हणणारे अमिताभ आज त्यांच्या आवाजाने अश्वस्थ करततात. तेंव्हा कोरोना किस खेत की मुली असं म्हणत कोरोनावर आपण मात करू असा आत्मविश्वास यायला लागतो नाही का ?
एखादा माणूस किती मोठा आहे. हेच जर सांगायचं आसेल तर त्याच्या कर्तुत्वाची उंची आधी मोजावी लागते. त्या मोजमापासाठी विशिष्ट परिमाणं असतात. मात्र अमिताभ यांच्या कर्तृत्व आणि यशाची उंची मोजण्यासाठी हे सगळे परिमाणं असमर्थ ठरतात. इतकी त्यांना आणि त्यांच्या यशाल उंची लाभली आहे. आज त्यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
✍️ रोहित गिरी औरंगाबाद