प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली सय्यदला 4 ऑक्टोम्बर 2020 रोजी एक वाढदिवस पार्टी अटेंड करण्यास सांगण्यात आले. तिने त्या पार्टीसाठी 1 लाख रुपये मानधन असल्याचे सांगितले. तेव्हा 1 लाख रुपयांच तु कायकाय करणार असे अश्लील भाषेत तिला विचारण्यात आले. दिपलीने त्या व्यक्तीशी याविरोधात वाद घातला. अहमदनगरला ये, भरचौकात तुझ्याबरोबर हाथरसमध्ये मुलीसोबत घडले तोच प्रकार करतो, अशी धमकी दिल्याचे तिने पोलिसात केलेल्या तक्रारीत सांगितले.
याप्रकरणी ओशिवारा पोलीस चौकीमध्ये 5 ऑक्टोम्बर रोजी तिने तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी गुन्हा दाखल करून घेतला. उपनिरीक्षक रविंद्र जाधव यांनी तपास घेत आरोपीला अहमदनगरमधून अटक केली.