हाथरसनंतर गुरूग्राममध्ये महिलेवर चार नराधमांकडून बलात्कार

8

हाथरस येथील बलात्काराचे प्रकरण ताजे असताना दिल्ली जवळ असलेल्या गुरूग्राम मध्ये बलात्काराची घटना समोर आली आहे. चार नराधमांनी एका ३२ वर्षीय महिलाचा बलात्कार केल्याची ही घटना आहे. बलात्कार केल्यानंतर त्या चार नराधमांनी पीडीत तरूणीला मारहाण केली. यामुळे महिलेच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. पीडीतेला स्थानिक दवाखान्यान दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर तिची परिस्थिती आणखी नाजूक झाल्याने तिला दिल्लीच्या सफदरजंग हास्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

गुरूग्राम पोलिसांनी चारही आरोपींनी तत्काळ अटक केली आहे.आरोपी फुड डिलिव्हरी कंपनीत काम करायचे. पंकज, पवन, रंजन आणी गोबिंद अशी आरोपींची नावे आहेत.चारही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. महिलेची आणि आरोपीची आधीपासून ओळख होती का याविषयी पोलिस जाणून घेणार आहेत. हाथरसमध्ये घडलेली घटना ताजी असताना पुन्हा गुरूग्राममध्ये बलात्काराची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.