हाथरस येथे भेट देण्यासाठी गेलेल्या, ‘या’ खासदारावर फेकली शाई

34

हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन  करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आता हाथरसमध्ये गर्दी केली आहे. आपचे खासदार संजय सिंहदेखील पीडितेच्या कु़टुंबियांना भेटायला हाथरसला गेले होते. त्यावेळी कुटुंबियांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेने देश हादरला आहे. हाथरस येथील पीडितेचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने देशातून संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातून उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत असताना, आता आपने सुद्धा भूमिका घेतलेली पाहायला मिळते आहे. उत्तर प्रदेशात सध्या तणावाचं वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खासदार संजय सिंह यांच्यावर शाई फेकण्याचा अचानक घडल्यामुळे सगळीकडे गोधंळ उडाला. शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.