हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही; मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सुनावले

15

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर दिलंय. त्यांनी अनेक मुद्यांवर राज्यपालांना धारेवर धरलं आहे. माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले. त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. असंही त्यांनी म्हणत कंगना प्रकरणाला हात घातला. महाराष्ट्राचे राज्यपाल हे भाजपा पक्षाचे आहेत अशी टीका कायम सोशल मीडियातून होत असते. उध्दव ठाकरे आणि राज्यपाल यांच्यात सख्य नसल्याच्या बातम्याही अनेकदा प्रसिद्ध झाल्या आहेत.