“हिंमत असेल तर…” चंद्रकांत पाटलांचे राष्ट्रवादीला आव्हान

20

2022 मध्ये मनपा निवडणुकीत पुण्याची जनता अजितदादा पवार हे तुमचे बाप आहेत, हे सिद्ध करून दाखवेल. काळजी करू नका, असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 2024 ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवून दाखवावी. मग कोण जास्त जिंकेल ते पाहू, असे म्हणत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हान दिले. राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतांना ते बोलत होते.

2022 कशाला 2024च्या विधानसभेसाठी माझे ओपन चॅलेंज आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना वेगवेगळे लढावे. भाजप देखील स्वबळावर लढेल. मग कोणाला किती जागा मिळतात, ते पाहू, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. १०५ आमदार असूनही विश्वासघात झाल्यामुळे आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही. अशी सलही त्यांनी व्यक्त केली.