हृतिक रोशनने खरेदी केलं सी-फेसिंग व्ह्यु घर किंमत ऐकून व्हाल थक्क!

8

   बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याने मुंबई मध्ये नवीन अलिशान घर घेतले आहे. जुहू वर्सोवा या महागड्या परिसरात दोन घरे खरेदी केली आहेत. त्या घराची किंमत जवळजवळ 100 कोटी रुपये आहे. ही दोन्ही घरे सी फेसिंग असून अरबी सागराचे मनोरम दृश्य दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून हृतिक रोशन त्याच्या स्वप्नातील घराची वाट पाहत होता. अखेर त्याने हे घर आपल्या नावावर केलचं.

या सी फेसिंग अपार्टमेंटचा एरिया 38,000 स्क्वेअर फूट इतका आहे. हे दोन अपार्टमेंट इमारतीच्या 14व्या, 15व्या आणि 16व्या फ्लोरवर आहे. त्यासोबत 6500 स्क्वेअर फुटाचा मोकळा टेरेस आहे. या इमारतीचे नाव मन्नत आहे. या अपार्टमेंच्या स्पेशल लिफ्टसोबत 10 पार्किंग लॉटही त्याला मिळणार आहेत. हे दोन्ही अपार्टमेंट त्याने समीर भोजवानी या बिल्डरकडून घेतल्याचे  समजते. हि संपूर्ण डील 97.50 कोटींची आहे.

हृतिक लवकरचं आपल्या सुपरहिरो चित्रपटाची सुरवात करणार आहे. तसेच तो लवकरचं आपल्या परिवारासोबत या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे. आजपर्यंत तो अक्षय कुमारच्या शेजारी राहत होता. आता हृतिक सी फेसिंग घरात शिफ्ट होणार आहे.