शरद पवारांच्या मागच्या वर्षीच्या पावसातील सभेमुळे नव्हे तर, स्वतः च्या कर्तृत्वामुळे ५४ आमदार निवडून आले. असे सिंधुदुर्ग चे माजी खासदार नीलेश राणे यांनी म्हटलं आहे. साताऱ्यातील पावसातील सभेमुळे राज्यातील राष्ट्रवादीला मोठा फायदा झाल्याचं बोललं जातंय. त्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. अनेक माध्यमांनी त्याबद्दल वार्तांकन केलं आहे. त्याच पावसातील सभेबाबत सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी आपले वेगळेच मत व्यक्त केले आहे. राणे यांनी ट्वीट करत असे म्हटले की ‘सगळे पैलवान उभ्याने लोळवले तरी २८८ पैकी ५४ आले… आणि ५४ पैकी अनेक आमदार स्वतःच्या कर्तुत्वावर निवडून आले पक्षामुळे नाही.
स्वतःच्या ट्विट सोबत त्यांनी मराठी वृत्त वाहिनी झी २४ तास यांची एक बातमी शेयर केली आहे. आणि म्हटलं की २४ तास करायला पाहिजे.