शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने एलजीबीटी सेल’ स्थापन केला आहे. सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहली केली
समाजात एलजीबीटी लोकांना समान वागणूक दिली पाहिजे. याचा विचार राष्ट्रवादीने केलाय. तसेच राष्ट्रवादीने निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकले आहे. असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. एलजीबीटी सेलची आज स्थापना झाली असून, प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत १४ जण काम करणार आहेत. समूहाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
सामाजिक न्याय मंत्रालयाचा कारभार राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडे आहे. त्यातून सामाजिक न्याय खात्यांतर्गत एलजीबीटी वेल्फेअर बोर्डसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे आणि प्रिया पाटील यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.