मुंबईत टिव्ही अभिनेत्रीला ड्रग पेडलरसोबत रंगेहात पकडलं

11

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्युनंतर बॉलीवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं आहे. आतापर्यंत नार्कोटिक्स विभागाने अनेक ड्रग्स विकणाऱ्यांना अटक केली आहे. हा तपास सुरू असताना आणखी एक घटना समोर आली. या प्रकरणात बॉलीवूडमधील बडेबडे कलाकार अडकले होते.

24 ऑक्टोम्बरला मुंबईत एका अभिनेत्रीला ड्रग्स विकत घेताना एनसीबीने रंगेहात पकडले. वार्सोच्या माछिमार भागातून दोन जणांना ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करणारी अभिनेत्री प्रितिका चौहान आणि फैसल नावाच्या ड्रग्स पेडलरला पकडले आहे. त्यांच्याकडून 99 ग्रॅम गांजा जप्त केला. या चौकशीत दिपक राठोड हे नाव समोर आले आहे. या व्यक्तीचा तपास एनसीबीकडून सुरू आहे.

फैसल हा ड्राइव्हर आहे आणि प्रितिका चौहान हि टिव्हीवरील मालिकांमध्ये काम करते. ‘संकट मोचन महाबली हनुमान, सावधान इंडिया आणि जग जननी माँ वैष्णोदेवी या कार्यक्रमात काम केले आहे. 2015 पासून ती इंडस्ट्रीमध्ये मनोरंजन विश्वात काम करते.