एकाच दिवशी पुण्यात होणार 1 लाख नागरिकांना लसीकरण

15

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत पुणे शहरात एकाच दिवशी 1 लाख नागरिकांना होणाऱ्या लसीकरण मोहिमेची माहिती दिली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने आज (1 एप्रिल) जिल्ह्यातील एक लाख नागरिकांना एकाच दिवशी कोरोनाची लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

पुण्यात दररोज 4 हजारांपेक्षा अधिक नवे कोरोनारुग्ण आढळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन एकाच दिवशी तब्बल 1 लाख नागरिकांना कोरोना लस देणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेता आवाहन आहे की मास्क वापरा. सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ ठेवा. सोशल डिस्टन्सिंगच्या तत्वाचे तंतोतंत पालन करा. काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे आवाहन देखील सुळे यांनी केले आहे.

यासाठीची सर्व जय्यत तयारी करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील लसीकरण केंद्रांवर लस पोहोचविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.