राममंदिरनिर्मीतीसाठी १००० कोटी निधी जमा!

16

अनेक दिवसांपासून वादग्रस्त असलेल्या अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि त्यानंतर राममंदिरनिर्मीतीकार्यास वेग आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांचे अयोध्येतील रामजन्मभूमिवरील राममंदिरनिर्मीतीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होते आहे. अयोध्येतील मंदिरनिर्मीतीसाठी राममंदिर जन्मभूमी ट्रस्टचे निर्माण करण्यात आले आहे.

अयोध्येतील या राममंदिनिर्मीतीकार्यास देशातील प्रत्येक नागरिकाचे सहकार्य लाभावे या ऊद्देशाने रामजन्मभूमि ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण देशभर निधी समर्पन अभियान राबवण्यात येत आहे. १५ जानेवारी ते १५ फेबृवारी या कालवधीतील हे अभियान आहे. अभियानास ऊत्तम प्रतिसाद मिळत असून दीड महिन्यातव १००० कोटी निधी जमा झाला असल्याची माहिती ट्रस्टचे एक विश्वस्त आणि कर्नाटकातील उडुपी येथील पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली आहे.

“दक्षिण भारतातील जनतेनं या मोहिमेला देलेल्या प्रतिसादामुळे मी खूपच आनंदी आहे. निधी गोळा करायच्या कामासाठी मी मोठा प्रवास केला आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या प्रकल्पासाठी मदत दिली आहे. निधीमध्ये वाढ होणं ही मंदिर निर्माणासाठी काम करणाऱ्या संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्वाची बाब आहे. अयोध्येत मंदिर उभारायचं आणि त्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची एवढाच ट्रस्टचा उद्देश नाही. तर पुढे जात रामराज्य म्हणजे आदर्श कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्याचं या प्रकल्पाचं अंतिम उद्दीष्ट आहे.” असेसुद्धा विश्वसंपन्न महाराज यावेळी म्हणाले.

सोबतच विश्वसंपन्न महाराजांनी कर्नाटकातील सर्व “मंदिर संरक्षित करण्याचीसुद्धा मागणी केली आहे. मंदिरं संरक्षित केल्यामुळे कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही तसेच भविष्यात वादही निर्माण होणार नाही” असेदेखील ते यावेळी म्हणाले. तसेच जातीय आरक्षणावरसुद्धा त्यांनी यावेळी भाष्य केले. आरक्षण हे जातीनुसार नाही तर आर्थिक निकषांवर देण्यात यावे अशी मागणीसुद्धा त्यांनी केली.