10 वीचा निकाल 10 जूनपर्यंत होणार जाहीर : वर्षा गायकवाड

8

राज्य सरकार १० वीच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम असून या परीक्षांचा निकाल जूनपर्यंत जाहीर करणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली.

दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत १० परीक्षांच्या निकालासंदर्भात मोठी घोषणा केली.

विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे १० वीच्या विद्यार्थ्यांना मुल्यमापनाआधारे सरसकट उत्तीर्ण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांचे हे मूल्यांकन कशा पद्धतीने असणार याची विस्तृत माहिती आज राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली.

तसेच ज्या विद्यार्थ्यांना ही निकालपद्धती समाधानकारक वाटत नसल्यास त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.