महाराष्ट्रासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत 1121 व्हेंटिलेटर येणार : प्रकाश जावडेकर 

12

पुणेकर नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. हा कालावधी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची बंधने पाळली जावीत, अ‍से मत जावडेकर यांनी व्यक्त केले.

तसेच महाराष्ट्रासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत 1121 व्हेंटिलेटर येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात दिली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली.

कोरोना रुग्णांचे ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करण्यासाठी जे मनुष्यबळ लागणारआहे त्यासाठी नॅशनल हेल्थ मिशन मधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.