पश्चिम बंगालमध्ये धुक्यामुळे 13 जणांचा बळी

10

पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीमध्ये धुक्यामुळे भीषण रस्ता अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धुपगुडी भागात बोल्डरने भरलेल्या ट्रक अनेक वाहनांना धडकला होता. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. उत्तर भारतात सध्या भरपूर थंडी आहे. या थंडीचे परिणाम देशाच्या इतर भागातही पहायला मिळत आहेत. पहाटेच्या सुमारास पश्चिम बंगाल भागात दाट धुकं पहायला मिळते. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर हा परिणाम झाला आहे. यामुळे अपघात होऊन 13 जणांना जीव गमवावा लागला आहे.