राजेश्री कॉलनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी

8

कल्याण दि.१५ : राजेश्री कॉलनी चिंचपाडा, कल्याण (पूर्व) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्याकडून भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण आणि पंचशील घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मधुकर गंगावणे , जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे, निलेश पवार, भागवत गमरे, सुधिर चाबूकस्वार, अविनाश शिरकर, राजेश चौहान, विशाल पटवा, प्रज्ञा गंगावणे, प्रेरणा गंगावणे, मुख्याध्यापिका आशा रणखांबे, संजय बालनाईक, ज्ञानेश्वर राठोड, रामदास सोनवणे इत्यादी उपस्थित होते.

मुलांना स्टेज डेरींग यावे, त्यांच्यामधील सामान्य ज्ञान जागृत व्हावे. याकरता प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. प्रश्नांचे योग्य उत्तर देणाऱ्या सर्व स्पर्धकांना शालेय वस्तू प्रोत्साहन म्हणून यावेळी बक्षिसे देण्यात आली.