भाजपचे नेते निलेश राणे यांनी राज्याचे ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. “मराठा समाजासाठी काम करणार्यांचा आवाक मोजण्याचं धाडस करुन नका. पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी घरात घेतलं नसतं तर त्यांची काय लायकी राहिली असती?” असअ शब्दांत निलेश राणेंनी अजित पवारांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोर्चा काढत राज्य सरकारवर टीका करणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर अजित पवारांनी टीका केली होती. अजितदादांनी केलेल्या त्या टीकेस निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
“काहीजण भावनेच्या आहारात बोलत असतात. संविधान व कायदा याचे त्यांना भान राहत नाही. हे नेते काही काळ आमच्यासोबतसुद्धा होते. यांचा आवाका आम्हाला माहितीये. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.” असे अजित पवार म्हणाले होते.
“अजित पवार काहीनाकाही बडबडत असतात. त्यामुळे त्यात काही नविन नाही. मात्र मराठा समाजासाठी काम करणार्यांचा आवाका मोजण्याचं धाडस त्यांनी करु नये. मराठा समाजाचा अपमान करु नये. पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवार साहेबांनी त्यांना घरी घेतले नसते तर त्यांची काय लायकी झाली असती.” अशा कठोर शब्दात ट्वीट करत निलेश राणेंनी अजित पवारांना लक्ष केले आहे.