मेहकर प्रतिनिधी – विष्णु आखरे पाटील
मेहकर तालुक्यातील बटाळा येथील 16 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 4 मार्चला दुपारी 1 च्या सुमारास घडली. करण कुंडलिक टेकाळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
करण गावातीलच एका मेडिकल वर कामाला होता. दुपारच्या सुमारास तो जेवण करण्यासाठी घरी गेला होता. करणची आई शेतात तर वडील मेहकर येथे आले होते. दुपारी वडिलांनी करणला फोन केला असता तो बंद दाखवण्यात येत होता.
करणचे वडील घरी आल्यानंतर त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेहकर येथे पाठवला आहे.अद्याप आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.