भारत-पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस सुरू आहेत. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. जवान डोळ्यात तेल घालून दहशतवाद्यांचा कट हाणून पाडत आहेत. सीमेवर दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना जवान निखिल दायमा हे हुतात्मा झाले आहेत. त्यांना 19 व्या वर्षी वीरमरण आले आहे.
राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील सैदपूर गावचे रहिवासी होते. जवान डोळ्यात तेल घालून दहशतवाद्यांचा कट हाणून पाडत आहेत. निखिल दायमा हे भारतीय सैन्याच्या राजपूत रेजिमेंटचे जवान होते. दोन दिवसांपूर्वी ते बेस कँपहून उरी येथे गेले होते. 19 वर्षीय निखिल यांची उरी येथे पहिली पोस्टिंग झाली होती. दहशतवाद्यांशी चकमकीदरम्यान निखिल यांना गोळी लागली आणि रुग्णालयात नेण्यात आले होते.
निखिल यांचे पार्थिव आज जम्मू-काश्मीरहून दिल्लीला रवाना होणार असून त्यानंतर त्यांच्या मूळ गावी सैदपूर येथे नेण्यात येणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवर निखिल यांना श्रद्धांजली वाहली आहे. शहीद निखिल दायमा यांचे वडील टॅक्सी चालक आहेत. तर लहान भाऊ चंदन दायमा भिवाडी येथे सध्या 10वीमध्ये शिकत आहे. शहीद निखिल यांचे आजोबाही सैन्यातून निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडून निखिल यांना सैन्यदलात जाण्याची प्रेरणा मिळाली होती. त्यांचं पार्थिव आज दिल्लीमध्ये आणलं जाणार असून तिथून मूळगावी रवाना होणार आहे.