पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासीयांशी संवाद साधला. कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. त्याकडे लक्ष देणे हे सध्य परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहे. ऐन सनासुदीच्या वेळेत जर दुर्लक्ष केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्याची शक्यता आहे. सोशल डिस्टसिंगचे पालन करून मास्कचा वापर करावा हा संदेश देत पंतप्रधान मोदी यांनी जनतेला काळजी घेण्यास सांगितले आहे. लस उपलब्ध झाल्यावर प्रथम कोणाला देणार, हे एसओपी ठरविण्यात येणार आहे.
देशातील 3 कोटी नागरीकांना प्रथम लस देण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय आयोजन करत आहे. त्यामध्ये 70 ते 80 लाख डॉक्टर्स असणार आहेत. देशात लस निर्माण झाली तर प्रथम डॉक्टर्सना प्राधान्य देण्यात येईल. कोरोनाच्या काळात फिल्डवर काम करणाऱ्या नागरिकांना ही लस सरकारचा प्रयत्न आहे. तसेच राज्य सरकारचे पोलीस कर्मचारी, सैन्य दल, होमगार्ड, वैद्यकीय कर्मचारी, वर्कर, सफाई कामगार, शिक्षक, ड्राइव्हर यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. जानेवारी ते जून पर्यंत व्हॅकसीन उपलब्ध होऊ शकते. यासाठी सरकारकडून प्राथमिक अहवाल तयार करण्यात येत आहे.