आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या शिक्षकांच्या पगारातून ३० टक्के कपात

0

आई वडिलांना शिक्षक सांभाळत नसतील व तसे निदर्शनास आल्यास त्यांच्या वेतनातून ३० टक्के रक्कम कपात करून आई वडिलांना देण्यात येईल. असा निर्णय आज नगर जिल्हा परिषदेत घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. या झालेल्या ठरावाचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाणार आहे.

यापूर्वी दहा नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेची सभा होणार होती. पण ऑनलाइन विरोधकांमुळे ही सभा होऊ शकली नाही. ती सभा आज घेण्यात आली. हा निर्णय झाल्याने अनेक शिक्षकांच्या आई-वडिलांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचा महाराष्ट्रात जयजयकार होऊ शकतो. महाराष्ट्रात इतर जिल्हा परिषदेतही अशा पद्धतीचे निर्णय होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. या निर्णयाची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर तसेच सर्व सभापती, गटनेते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. लातूर जिल्हा परिषदेत अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे .