पालघर मधील ब्राह्मणगाव ता.मोखाडा येथील दुकानदार अनंता बाळू मौळे यांच्या घर व दुकानास शॉट सर्किट मुळे आग लागली होती. या दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहाणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून जास्तीत जास्त मदत देणार. जखमींच्या उपचारात काहीही कमी पडु नये याची काळजी घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आग लागून झालेली जीवित हानी ही गंभीर घटना आहे. दुर्घटनाग्रस्त कुटुंबासोबत शासन असून मौळे कुटुंबीयांना शासन सर्वोतोपरी मदत करेल. मुख्यमंत्री सहायता निधीतून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रस्ताव पाठविणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
मध्यरात्री लागलेल्या या आगीत चार जणांचे प्राण गेले. दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांची नाशिक येथील जिल्हा रुग्णालया मध्ये जाऊन दादा भुसे यांनी भेट घेतली. त्यांच्या उपचारामध्ये काहीही कमी पडू देऊ नये, अशा जिल्हा शल्य चिकित्सक यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सूचना दिल्या.