त्यादिवशी पुजा चव्हानच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे ४५ मिस्ड कॉल्स?

26

पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणास दिवसेंदिवस नविन वळण लागते आहे. याप्रकरणी नाव पुढे आलेले वनमंत्री संजय राठोड १५ दिवसांनंतर महाराष्ट्रासमोर आले आणि आता त्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजास सुरुवातदेखील केली आहे. भाजप मात्र यावरुन चांगलाच आक्रमक झाली आहे. पुजा चव्हान हीच्या मृत्युच्या दिवशी पुजाच्या मोबाईलवर संजय राठोड नावाने तब्बल ४५ मिस्ड कॉल्स आले होते अशी माहिती समोर आली आहे. संजय राठोड नावाने ४५ मीस्डकॉल ढळढळीत दिसत असतांनासुद्धा पोलिस त्यावर चुप आहे म्हणजे संजय राठोड यांना अभय देण्याचा प्रकार चालला असल्याचा दावा चीत्रा वाघ यांनी केला आहे. टीव्ही. ९ मराठी वृत्तवाहिनीशी त्या बोलत होत्या.

भाजप प्रदेश ऊपाध्यक्षा चित्रा वाघ याप्रकरणी सातत्याने आवाज ऊठवत आहे. त्यादिवशी पुजा चव्हानच्या मोबाईलवर आलेले हे ४५ मीस्डकॉल कोणाचे आहेत? याची पोलिसांनी चौकशी करावी आणि त्याची सत्यता जनतेसमोर मांडावी. या संपूर्ण प्रकरणातील पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पुणे पोलिसांकडून हा तपास काढून घेत एखाद्या सक्षम आयपीएस अधिकार्‍यास तो सोपवावा अशी मागणीसुद्धा चीत्रा वाघ यांनी यावेळी केली.

चीत्रा वाघ या आक्रमकतेने हा मुद्दा ऊचलून धरतायत. काल(दि.२५ फेबृ) त्यांनी पुजा चव्हानने ऊडी मारली त्या घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यानंतर थेट पोलिस स्टेशन गाठत पोलिसांवर संताप व्यक्त केला. त्यानंतर पत्रकारपरिषद घेत. संपूर्ण प्रकरणातील पोलिसांची संशयास्पद भूमिका त्यांनी माध्यमांसमोर ठेवली आणि मुख्यमंत्री तसेच शरद पवार यांच्याकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.

संजय राठोड यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळेसुद्धा त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. भाजपने यावरुन मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे काही नेतेसुद्धा संजय राठोड यांच्यावर नाराज अाहे. ऊद्धव ठाकरेवंवरसुद्धा संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा याकरिता स्वकीयांकडून दबाव येत असल्याची माहिती मिळते आहे.