कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांनी चीनबरोबर व्यापारी संबंध तोडले आहेत. चीनच्या वस्तूंवर बंधन घातली आहेत. 5G तंत्रज्ञानाच्या यशस्वी परिक्षणानंतर भारतात रिलायन्स जिओकडून 5G तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी झाली आहे.
अमेरिकन टेक्नॉलॉजी फर्म क्वालकॉमसोबत रिलायन्स जिओ कंपनीने अमेरिकेत 5G टेक्नॉलॉजीचे यशस्वी परीक्षण केले आहे. रिलायन्स जिओचे प्रेसिडेंट मेथ्यू ओमनने क्वालकॉम इव्हेंटमध्ये सांगितलं की, क्वालकॉम आणि रिलायन्सची सबसिडरी रेडिसीस सोबत एकत्र येत आम्ही 5G तंत्रज्ञान विकसित करत आहोत. त्यामुळे भारतात हे तंत्रज्ञान लाँच केले जाऊ शकते. जवळपास तीन महिन्यांपूर्वी 15 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीच्या बैठकीत रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी 5G टेक्नॉलॉजी घोषणा केली होती.