‘व्हॅलेंटाइन्स विक’ दरम्यान ताज हॉटेलमध्ये 7 दिवस मोफत राहण्याची सोय; पहा काय आहे सत्य

10

व्हॅलेंटाईन डे हा कपल्सच्या लाईफचा स्पेशल दिवस असतो. यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब हे वेगवेगळ्या ऑफर्स ठेवत असतात. सोशल मीडिया च्या वापरामुळे कोणताही मेसेज लगेच व्हायरल होतो. त्यामुळे अनेकांची फसवणूक देखील होत असते.

व्हॅलेंटाईन डे १० दिवसांवर आला आहे आणि व्हॉट्स ऍपवर एक मेसेज व्हायरल झाला आहे. ताज हॉटेल व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एक्स्पिरियन्स गिफ्ट कार्ड देत असल्याचा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये ताज हॉटेलचे सात दिवसाचे पॅकेज जिंकण्याची संधी, नवीन मोबाइल घेण्याची संधी, लाखो रुपये जिंकण्याची संधी अशा प्रकारच्या स्किमना बळी पाडले जात आहे.

व्हॅलेंटाइन डेच्या नावाने फसवणुकीचा मोठा प्रकार घडू शकतो. कोणत्याही फसवणुकीपासून वाचण्यासाठी ठाणे सायबर सेलकडून जनतेला खास करुन तरुणांना सतर्क करण्यात आले आहे. ठाणे पोलिसांनी देखील याबाबत माहिती देताना ट्विट केलं आहे. व्हॅलेंटाइन डेच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर मोबाइल फोन, गिफ्ट्स स्किम, ताज हॉटेल काडर्स स्किम याबाबत फसवणूक करणाऱ्या लिंक व्हायरल होत आहेत. नागरिकांना अशा खोट्या, फसव्या लिंकला कोणताही रिप्लाय करु नये, लिंकवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन गुन्हे शाखेच्या सायबर सेलच्या पोलिसांकडून करण्यात आले आहे.