बारामतीतील प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीत परवा म्हणजेच 5 मे पासून कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. लाॅकडाऊनमधे मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.
यात दूधवल्याना सकाळी 7 ते 9 पर्यंत मुभा देण्यात आली आहे .तसेच हा 7 दिवसांचा कडक लॉक डाऊन बारामती करांनी पाळणं गरजेचं आहे.
वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर बारामती प्रशासनाचा हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 5 ते 11 मे दरम्यान हा कडक लॉकडाऊन असणार आहे.किराणा, भाजी मंडई बंद राहणार आहेत.