कोणताच राजकीय पक्ष यांच्या बाजूने कधीच उभा राहत नाही

31

हा फोटो चेन्नई तमीळनाडूतील आहे. ही महिला केवळ २२ वर्षाची आहे. २४ वर्षीय अर्जुन कुमार हा नाले साफ करणारा सफाई कामगार होता. त्याचा काम करताना मृत्यू झालाय, त्याच्या अंतिम दर्शनावेळी त्याच्या पत्नीने त्याच्या ओठावर आपले ओठ टेकवले आहेत.

या दोघांचं लग्न होऊन ८ वर्ष झालेली होती आणि त्यांना एक दीक्षा नावाची ७ वर्षाची चिमुकली देखील आहे. मागच्या ५ वर्षात देशात सगळ्यात जास्त सफाई कामगारांचे मृत्यु तामिळनाडूत झालेले आहेत. आणि इतर राज्यात देखील प्रमाण तसंच आहे. मृत्यू झाला तर कुठल्या प्रशासनाला विशेष असं देणंघेणं नसतंय.

विशेष म्हणजे हे सफाई काम करणारे ९९℅ लोकं हे आदिवासी आणि दलित समाजातून येतात. यांना प्रशासनाकडून कोणती पेन्शन मिळत नाही किंवा मरणानंतर एखादं लाखभर रुपये कुणी जाहीर करत नाही. कोणती कामगार संघटना किंवा कोणताच राजकीय पक्ष यांच्या बाजूने कधीच उभा राहत नाही.

यांना किती पगार असतो हे वेगळं सांगायची गरज नाही. यांच्या आरोग्यासाठी प्रशासन विशेष काहीच करत नाही, पण तरीही काही थोर माणसं म्हणतात की, आरक्षणच रद्द करून टाका, तर त्यांनी हा फोटो एकदाचं नीट बघावा,

कारण असं काम करणाऱ्या सगळ्यांच मागास समाजांच्या पुढच्या पिढ्यांनी हे काम करू नये म्हणून आरक्षण असतंय मित्रांनो…